महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. Read More
Tukaram Mundhe Transfer: जनहिताचे विषय ते उचलून धरत असल्यानं त्यांना नागरिकांचा पूर्ण पाठिंबा असतो. पण, नगरसेवक, आमदार, खासदारांना ते अजिबातच किंमत देत नाहीत आणि नेमकं हेच लोकप्रतिनिधींना खटकतं. ...
स्मार्ट सिटी प्रकल्पावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न आणि हेकेखोरपणा हेच तुकाराम मुंढे यांना महापालिका आयुक्त पदावरून हटविण्यामागील एक मोठे कारण ठरले आहे. ...
नागपुरातील त्यांचा कार्यकाळ संपणार असला तरी त्यांची ही लहानशी ‘इनिंग’ पुढील अनेक वर्षे हृदयात कायम असेल असे म्हणणाऱ्या नागपूरकरांच्या तोंडून शब्द बाहेर पडत होते...‘हॅट्स ऑफ टू मिस्टर मुंढे’ . ...
आयुक्तांनी पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून कार्य करावे, हीच आमची अपेक्षा होती, अशी प्रतिक्रिया महापौर संदीप जोशी यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर व्यक्त करीत त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. ...