सतत बदल्या होणे हा ‘ग्रेट’पणा नाही!; वरिष्ठ निवृत्त अधिकाऱ्यांचे तुकाराम मुंढेंना खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 07:14 AM2020-08-29T07:14:00+5:302020-08-29T07:14:29+5:30

सगळे लोकप्रतिनिधी किंवा सगळे अधिकारी वाईट किंवा चोर नसतात. अधिकाऱ्यांनी संयम ठेवायला शिकले पाहिजे. लोकनियुक्त प्रशासन विरोधात जात असेल तर ते तसे का जाते याचा विचार अधिकाऱ्यांनी केला पाहिजे.

Constant change is not greatness; Stone to senior retired officer Tukaram Mundhe | सतत बदल्या होणे हा ‘ग्रेट’पणा नाही!; वरिष्ठ निवृत्त अधिकाऱ्यांचे तुकाराम मुंढेंना खडे बोल

सतत बदल्या होणे हा ‘ग्रेट’पणा नाही!; वरिष्ठ निवृत्त अधिकाऱ्यांचे तुकाराम मुंढेंना खडे बोल

googlenewsNext

अतुल कुलकर्णी 

मुंबई : देशातील अन्य राज्याच्या तुलनेत, महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी अतिशय संयमी आहेत. त्यांच्याशी तुमचे पटत नसेल, तर दोष तुमच्यात आहे. आपल्या सतत बदल्या होतात, याचा अर्थ आपण फार ग्रेट आहोत, असा समज कोणत्याही अधिकाºयाने करून घेऊ नये, अशा शब्दांत माजी मुख्य सचिवांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खडे बोल सुनावले आहेत. नागपूर महापालकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची काही महिन्यातच पुन्हा एकदा बदली झाली. त्यावरून अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात संघर्ष असतो. लोकप्रतिनिधी वाईटच वागतात. अधिकारी फार चांगले असतात, अशा चर्चांना सुरुवात झाली. त्यावर निवृत्त अधिकाºयांनी मांडलेली मतं.

आपले लोकप्रतिनिधी चांगलेच
महाराष्ट्रातील राजकारणी चांगले आहेत. त्यांच्याशी जर तुमचे जमत नसेल तर दोष तुमच्यात आहे. एवढे चांगले लोकप्रतिनिधी अन्य कुठल्याही राज्यात सापडणार नाहीत. आपल्या लोकप्रतिनिधींना अधिकाºयांशी कसे वागावे हे कळते. मी नेहमी श्रीकर परदेशी यांचे उदाहरण देत आलो आहे. परदेशी यांनी अनेक चांगली कामे केली. आज ते पंतप्रधान कार्यालयात आहेत. ज्यांच्या सतत बदल्या होतात ते अधिकारी खूप 'कडक' असतात, असा समज कोणीही करुन घेऊ नये. - रत्नाकर गायकवाड, माजी मुख्य सचिव

अधिकाऱ्यांना संयम हवा
प्रशासनात काम करताना टीका होतच असते. कधी कौतुक होते. काम करताना अनेकदा वादाचे प्रसंग येतात. पण आपल्याला काय करायचे याविषयी मनात स्पष्टता असली की असे वाद किरकोळ ठरतात. संयमाने वागण्याची जबाबदारी अधिकाºयांची जास्त असते. लोकप्रतिनिधी अडचणी सांगतच राहणारच. मात्र अधिकाºयांना सगळ्यांना सोबत घेऊन जाता आले पाहिजे. तुकाराम मुंडे यांनी चांगले आहेत, पण सोबतच्या अधिकारी-कर्मचाºयांना सोबत घेऊन जाता आले पाहिजे, त्यात ते कमी पडले असे मला वाटते. - जॉनी जोसेफ, माजी मुख्य सचिव

सतत बदली करणे बेकायदा
सतत अधिकाºयांच्या बदल्या करणे हे बदली कायद्याला अनुसरून नाही. जर अधिकारी चुकत असतील तर त्यांना समजावून सांगणे, त्यांच्या चुका दाखवून देणे, हे प्रशासनाचे काम आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी ते केले पाहिजे. बदली हा उपाय नाही. अधिकाºयांनी स्वत:च्या सतत होणाºया बदलांचे आत्मपरीक्षण केले पाहिजे, दुर्दैवाने आपल्याकडे ते होत नाही. बदली झाली म्हणजे आपण फार वेगळे आहोत, असा समज अधिकाºयांमध्ये वाढू लागला आहे. यामुळे जनतेचेच नुकसान होते, याकडे कोणीही लक्ष देत नाही हे आणखी जास्त दुर्दैव आहे. - जे. एफ. रिबेरो, माजी पोलीस महासंचालक

मीच खरा, हा आविर्भाव चुकीचा
सगळे लोकप्रतिनिधी किंवा सगळे अधिकारी वाईट किंवा चोर नसतात. अधिकाºयांनी संयम ठेवायला शिकले पाहिजे. लोकनियुक्त प्रशासन विरोधात जात असेल तर ते तसे का जाते याचा विचार अधिकाºयांनी केला पाहिजे. जर लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आपल्या विरोधात जात असतील, तर आपण तेथे काम करू नये असे मला वाटते. 'मलाच सगळं कळतं' असा अविर्भाव दोघांच्याही बाजूने योग्य नाही. यात कोणाचे चुकले हा तपासाचा भाग असला तरी, अधिकाºयांनी संयम सोडला की काय होते हे या प्रसंगातून लक्षात येते.
- अजित पारसनीस, माजी पोलीस महासंचालक

जबाबदारीनं वागलं पाहिजे
लोकप्रतिनिधींना काही कळत नाही असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांना लोकांनी निवडून दिलेले असते. जर ते चुकत असतील, तर त्यांना समजावून सांगण्याची क्षमता आपल्यामध्ये हवी. ती जर नसेल आणि परिस्थिती हाताळता येत नसेल तर अधिकारी म्हणून आपण दुबळे ठरतो. आयएएस ही प्रशासनातील सर्वोच्च व्यवस्था आहे. त्यामुळे या पदावर असणाºयांनी जबाबदारीने वागायला पाहिजे.
- महेश झगडे, माजी आयुक्त, एफडीए

येणारा प्रत्येक जण वाईट नसतो
आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणचा शिपाई असो की लोकप्रतिनिधी, येणारा प्रत्येकजण वाईटच आहे या नजरेने कोणाकडे बघणे हे अत्यंत चुकीचे आहे. मुंडे अत्यंत प्रामाणिक आहेत. मात्र त्यांच्या वागणुकीत त्यांनी बदल घडवून आणणे आवश्यक आहे. एखाद्या अधिकाºयाची सतत बदली होणे चांगले की, एखाद्या अधिकाºयाने एकाच ठिकाणी तीन ते चार वर्ष काम करून लोकांचे प्रेम कौतुक मिळवणे, आपल्या कामातून लोकांवर स्वत:ची छाप सोडणे चांगले, हा विचार प्रत्येक अधिकाºयाने स्वत: करायचा आहे.- सी. एस. संगीतराव, माजी प्रधान सचिव

Web Title: Constant change is not greatness; Stone to senior retired officer Tukaram Mundhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.