शहरातील मुख्य रस्त्यांवर व प्रमुख चौकात बेशिस्तपणे रस्त्यावर वाहने उभे केली जात असल्यामुळे सातत्याने वाहतुक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे दरवर्षी अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबवूनही वाहतूकीची समस्या सुटलेली नाही. ...
विजासन मार्गे चारगाव येथे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे फाटक दुरुस्तीच्या कामामुळे तब्बल ११ तास बंद होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. येथील नागरिकांसह विद्यार्थी कामगारांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. ...
जड वाहतुकीसोबतच इतरही वाहने नेहरू पार्क चौकाला वळसा न घालता, खंडेलवाल भवन रोडवरून हुतात्मा चौकातून जात असल्याने या चौकात वाहनांची मोठी गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी होत आहे. ...
येथील स्टेशन रोड परिसरातील वस्तू आणि सेवा कर कार्यालया जवळील एक जुने झाड शुक्रवारी मध्यरात्री रस्त्यावर आडवे झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे स्टेशन रोड परिसरातील वाहतूक सकाळी १० वाजेपर्यंत खोळंबली होती. ...