शहरातील वाहतूक कोंडी ठरतेय जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:40 AM2019-07-15T00:40:05+5:302019-07-15T00:41:17+5:30

शहरातील मुख्य रस्त्यांवर व प्रमुख चौकात बेशिस्तपणे रस्त्यावर वाहने उभे केली जात असल्यामुळे सातत्याने वाहतुक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे दरवर्षी अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबवूनही वाहतूकीची समस्या सुटलेली नाही.

The traffic in the city is bound to be life threatening | शहरातील वाहतूक कोंडी ठरतेय जीवघेणी

शहरातील वाहतूक कोंडी ठरतेय जीवघेणी

Next
ठळक मुद्देप्रशासनाचे कारवाईकडे दुर्लक्ष : नागरिकांना पायी चालणे झाले कठीण

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरातील मुख्य रस्त्यांवर व प्रमुख चौकात बेशिस्तपणे रस्त्यावर वाहने उभे केली जात असल्यामुळे सातत्याने वाहतुक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे दरवर्षी अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबवूनही वाहतूकीची समस्या सुटलेली नाही.
शिवाय सकाळी सायंकाळच्यावेळी शाळकरी विद्यार्थी वृध्द नागरिक रस्त्यावरुन ये-जा करीत असताना अती वेगाने येणारे दुचाकीस्वार ट्रॅक्टर चालकांच्या भीतीने रस्त्यावरुन चालताना जीव मुठीत घेवून चालावे लागते. त्यामुळे अशा बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी शहरवासीयांमधून होत आहे. भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौक, राजीव गांधी चौक, खांबतलाव रोड तसेच महात्मा गांधी चौकात वारंवार होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे वाहनधारकांसह सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र याकडे पोलीस प्रशासनाची मात्र दुर्लक्ष होत आहे. गांधी चौकात पोलीस स्टेशनसमोरच वाहनाची लांबच लांब रांग लागत असताना पोलीस कारवाई करताना दिसून येत नाही.

नागरिकांची मानसिकता बदलेना
जवळपास दहा वर्षापुर्वी रस्त्याच्या एका कडेला वाहने पार्क केली जावी, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अतिक्रमणाच्या विळख्यात कोंडलेला रस्त्याचा श्वास आधीच गुदमरलेला असतांना नागरिकांचीही मानसिकता बदलायला तयार नाही. अशा स्थितीत वाहतुक शाखेचे कर्मचारीही हतबल दिसतात. एकट्या पोस्टआॅफीस चौकातही अशीच स्थिती दिसून येते. ऐतिहासीक वारसा लाभलेल्या भंडारा शहरातील मुख्य रस्त्याचे हाल झाले असताना त्यावर कायम तोडगा निघालेला नाही.

रस्त्यावर जनावरांचे बस्तान
दीड लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरातील रस्त्यावर मोकाट जनावरांचे वास्तव्य दिसून येते. अशावेळी लहान मोठे अपघातही घडले आहेत. शहरात बेवारस जनावरांसाठी कांजी हाऊसची व्यवस्था असतानाही पालिका प्रशासनाने त्याच्या देखभालीकडे लक्ष दिलेले नाही. परिणामी मोकाट जनावरे रस्त्यावर फिरुन रहदारीला अडथळा निर्माण करीत असतात. यावर पालिका प्रशासन गांभिर्याने निर्णय घेणार काय असा सवालही उपस्थित होतो.

Web Title: The traffic in the city is bound to be life threatening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.