जिल्ह्याचे तापमान एकीकडे ४० अंशापुढे गेले असताना परभणी व पूर्णा शहरासाठी निम्न दुधना प्रकल्पातून ८ दलघमी पाणी सोडण्यात आल्याने दुधना नदीचे पात्र तुडूंब भरले आहे. हे पाणी दुधनातून पूर्णा नदीत प्रवाही झाले आहे. ...
पाण्याची तीव्रटंचाई आणि उन्हाची तीव्रता वाढत असल्याने दांडेगाव शिवारातील केळीच्या बागा होरपळून जाण्यास सुरूवात झाली असून या भागातील केळी उत्पादक शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. ...
तब्बल सात महिन्यांच्या विलंबानंतर २१ व २२ एप्रिलला बीड येथे सहावे व्यसनमुक्ती साहित्य संमेलन होणार आहे़ या विलंबामुळे कडक उन्हाच्या झळा उपस्थितांना सहन कराव्या लागणार आहेत. ...
देशातील सर्व उपखंडात एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यात तापमान सरासरीच्या तुलनेत किमान १ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे़ मध्य महाराष्ट्र, विदर्भासह पश्चिम भारतात या तीन महिन्यातील कमाल तापमानात किमान ०़५ अंश सेल्सि ...
उन्हाळ्याने लोकांना हैराण केले असतानाच सातारा शहरातील वीजपुरवठा मंगळवारी मेंटेनन्ससाठी वीज कंपनीने बंद केल्याने नागरिक त्रासून गेले. तर दुसऱ्या बाजुला ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने शेतीपंपाची कनेक्शन्स काही ठिकाणी बंद असल्याने शेतकऱ्यावर संक्रात ...
नाशिककरांना यंदा एप्रिल महिन्यात प्रखर उन्हाचा तडाखा जाणवणार असल्याची चिन्हे आहे. एप्रिलच्या दुसऱ्याच दिवशी हंगामातील उच्चांकी ३९.२ अंशांपर्यंत कमाल तपमानाचा पारा पोहचला. गतवर्षी २ एप्रिलला अवघे ३५.३ इतके कमाल तपमान नोंदविले गेले होते. ...