काही दिवसांपूर्वीच हैदराबादमध्ये एका तहसीलदाराच्या घरात घबाड सापडले होते. तर आंध्र प्रदेशमधील अनंतपूरच्या कोषागार (treasury) विभागाच्या कर्मचाऱ्याकडेही मोठ्या प्रमाणावर सोने, चांदी, पैसे सापडले होते. या आठवड्यातील ही तिसरी रेड आहे. ...
सीआरपीसीच्या कलम 151 नुसार खबरदारीचा उपाय म्हणून नायडू यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना विमानतळाच्या व्हीआयपी कक्षात पाठवण्यात आल्याचे विशाखापट्टनमचे पोलिस आयुक्त राजीव कुमार मीना यांनी माध्यमांना सांगितले. ...
चंद्रबाबू नायडू ज्या इमारतीत अधिकाऱ्यांच्या, पक्षातील नेत्यांच्या बैठकांसह जनता दरबार भरवायचे ती इमारत जमिनदोस्त करण्यात आली आहे. त्यामुळे परदेशातून परतल्यानंतर चंद्रबाबू प्रजा वेदिकाच्या शेजारी असलेल्या आपल्या निवासस्थानी राहत आहेत. ...
राज्य सरकारने शनिवारी चंद्रबाबू नायडू याचा अमरावती येथील प्रजा वेदिका बंगला ताब्यात घेतला होता. त्यानंतर टीडीपीने याला द्वेषाचे राजकारण म्हटले होते. ...