अफाट संपत्ती! तीन किलो सोने, दोन किलो चांदी, नोटांच्या थप्प्या; टीडीपीच्या नेत्यावर सीबीआयचा छापा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 11:50 AM2020-08-22T11:50:03+5:302020-08-22T11:53:51+5:30

काही दिवसांपूर्वीच हैदराबादमध्ये एका तहसीलदाराच्या घरात घबाड सापडले होते. तर आंध्र प्रदेशमधील अनंतपूरच्या कोषागार (treasury) विभागाच्या कर्मचाऱ्याकडेही मोठ्या प्रमाणावर सोने, चांदी, पैसे सापडले होते. या आठवड्यातील ही तिसरी रेड आहे.

OMG! Three kilos of gold, two kilos of silver jewellery; CBI raids TDP leader | अफाट संपत्ती! तीन किलो सोने, दोन किलो चांदी, नोटांच्या थप्प्या; टीडीपीच्या नेत्यावर सीबीआयचा छापा

अफाट संपत्ती! तीन किलो सोने, दोन किलो चांदी, नोटांच्या थप्प्या; टीडीपीच्या नेत्यावर सीबीआयचा छापा

googlenewsNext

हैदराबाद : सीबीआयने शुक्रवारी आप्को (स्टेट हँडलूम वीवर्स कोऑपरेटीव्ह सोसायटी) चे माजी अध्यक्ष आणि तेलगू देसम पक्षाचे नेता  गुज्जल श्रीनिवासुलू (Gujjala Srinivasulu) यांच्या घरी आणि ऑफिसमध्ये छापा मारला. यावेळी सीबीआयला करोडो रुपयांच्या संपत्तीचा शोध लागला आहे. 


गुज्जल श्रीनिवासुलू यांच्या खाजीपेट येथील घरी आणि कार्यालयावर छापा टाकण्यात आला. यावेळी तीन किलो सोने, दोन किलो चांदी, एक कोटींपेक्षा अधिक रोख रुपये आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय 10 लाख रुपयांच्या जुन्या नोटादेखील हैदराबादच्या घरातून जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच १० लाख रुपयांच्या नव्या नोटाही सापडल्या आहेत.  


तीन किलो सोन्यामध्ये करोडो रुपयांच्या किंमतीचे दागिने, हारही जप्त करण्यात आले आहेत. सीबीआयने सध्या ही संपत्ती जप्त केली आहे. याचबरोबर करोडो रुपयांच्या सोन्याच्या, जडजवाहिर असलेल्या बांगड्याही जप्त करण्यात आल्या आहेत. 


 

पुन्हा आंध्र प्रदेश
काही दिवसांपूर्वीच हैदराबादमध्ये एका तहसीलदाराच्या घरात घबाड सापडले होते. या तहसीलदाराला आंध्र प्रदेशमधील अनंतपूरच्या कोषागार (treasury) विभागाच्या कर्मचाऱ्याने कमालीचे मागे टाकले आहे. या कर्मचाऱ्याकडे ट्रंकच्या ट्रंक भरून सोन्या, चांदीचे दागिने भांडी सापडल्य़ाने छाप्यासाठी गेलेल्या पोलिसांचेही डोळे विस्फारले आहेत. या खजिनदार कर्मचाऱ्याकडून पोलिसांनी मोठ्या संख्येने सोने, चांदी, रोख रक्कम, एफडी, पैसे दिल्याचे वादा केलेले कागदपत्र, कार आणि महागडी बाईकसर अन्य संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

डीएसपींनी सांगितले की, त्याच्याकडे 2.42 किलो सोने, 84.10 किलो चांदी आणि 15.55 लाखांची रोख रक्कम सापडली. तसेच त्याच्या नावावर 49 लाखांचे फिक्स डिपॉझिट, 27.05 लाखांचे बॉन्डही सापडले आहेत. तर जमिन खरेदी-विक्री व्यवहारात सहकार्य करण्यासाठी तहसिलदाराने ही 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. एसीबीच्या पथकाने तहसीलदार बलाराजू नागराजू यांच्या घरावर छापा टाकला होता. त्याच्यकडेही मोठ संपत्ती सापडली होती.

अन्य महत्वाच्या बातम्या...

शिबू सोरेन यांना कोरोना; झारखंड मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचीही होणार टेस्ट

सोनू सूदचे 'ते' ट्विटर खाते बनावट; म्हणाला ''लवकरच अटक होणार''

65 वर्षांची महिला, 14 महिन्यांत 8 मुलींना जन्म दिला; घोटाळेबाज बिहारमध्ये झाले शक्य

वंदे भारत! चीनला रेल्वेचा आणखी एक झटका; 1500 कोटी रुपयांची निविदा रद्द

Railway Recruitment : रेल्वे भरती! जागा वाढल्या, संधी साधावी; विना परिक्षा होणार निवड

युवा नेत्याची मोठी तयारी! सीबीआयसमोर स्वत: जाणार; भाजपाचा आरोप

Web Title: OMG! Three kilos of gold, two kilos of silver jewellery; CBI raids TDP leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.