andhra pradesh chandrababu naidu praja vedika home road | चंद्रबाबू नायडूंच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावरही जगन मोहन रेड्डींची वक्रदृष्टी
चंद्रबाबू नायडूंच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावरही जगन मोहन रेड्डींची वक्रदृष्टी

नवी दिल्ली - आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाही ये. सत्तेत असताना नायडू यांनी बनविलेल्या प्रजा वेदिका इमारतीवर वायएसआर काँग्रेस प्रमुख आणि मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी बुडलडोजर फिरवले. आता वायएसआर काँग्रेची वक्रदृष्टी नायडू यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडली आहे.

प्रजा वेदिका इमारत नियम धाब्यावर बसवून उभारण्यात आली होती, असा दावा करण्यात आला आहे. यातच आता नायडू यांच्या निवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून वाद निर्माण झाला आहे. वायएसआर आमदाराने दावा केला की, नायडूंच्या घराकडे जाणारा रस्ता शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे हा मार्ग शेतकऱ्यांना परत करावा. त्यामुळे हा रस्ता देखील शेतकऱ्यांना परत देण्यात येणार का, असा प्रश्न उपस्थित होते आहे.

यापूर्वी चंद्रबाबू नायडू ज्या इमारतीत अधिकाऱ्यांच्या, पक्षातील नेत्यांच्या बैठकांसह जनता दरबार भरवायचे ती इमारत जमिनदोस्त करण्यात आली आहे. त्यामुळे परदेशातून परतल्यानंतर चंद्रबाबू प्रजा वेदिकाच्या शेजारी असलेल्या आपल्या निवासस्थानी राहत आहेत. प्रजा वेदिका इमरात पाडत असताना टीडीपीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थितीत होते. मोठ्या बंदोबस्तात एक जेसीबी, सहा ट्रक आणि ३० कामगारांच्या मदतीने इमारत तोडण्यात येत आहे.

Web Title: andhra pradesh chandrababu naidu praja vedika home road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.