अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे. Read More
खबरदारीच्या सर्व उपाययोजना मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना - तौक्ते चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. येत्या चोवीस तासांत ते गुजरातकडे सरकण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. ...
Amravati news Tauktae Cyclone तौक्ते वादळामुळे झालेला हवामान शास्त्रीय बदलात रविवारी दुपारी मान्सूनपूर्व वादळासह पावसाने अमरावती शहराला चांगलाच तडाखा दिला. ...
तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना सावधानतेचा इशारा तसेच सुरक्षा संबंधीच्या उपाययोजनांची वेळोवेळी माहिती पोहोचण्यासाठी जिल्हा प्रशासनाने "मोबाईल एसएमएस ब्लास्टर सेवा" सुरू केली आहे. ...
cyclone tauktae: तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी राहणाऱ्या आतापर्यंत 5 हजार 942 नागरिकांचे स्थलांतरण पूर्ण झाले ...