cyclone tauktae: तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 09:26 PM2021-05-16T21:26:59+5:302021-05-16T21:27:25+5:30

तौक्ते चक्रीवादळ संकटाला जिल्हा प्रशासन तोंड देण्यासाठी तयारी करीत आहे. पोलिसही वादळाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला सहकार्य करत आहे.

Raigad police ready on the backdrop of cyclone tauktae | cyclone tauktae: तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस सज्ज

cyclone tauktae: तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस सज्ज

Next

निखिल म्हात्रे
अलिबाग - तौक्ते चक्रीवादळ संकटाला जिल्हा प्रशासन तोंड देण्यासाठी तयारी करीत आहे. पोलिसही वादळाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला सहकार्य करत आहे. समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी वादळ काळात प्रशासनाला साथ द्यावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. वादळ हे रायगड समुद्रात 17 मेच्या पहाटे येणार असल्याने पोलीस यंत्रणा रात्रभर सज्ज राहणार आहे.

रायगड जिल्ह्याला 240 किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, उरण या तालुक्यांना समुद्रकिनारे आहेत. वादळाचा फटका हा समुद्रकिनारी आणि खाडी किनारी राहणाऱ्या नागरिकांना अधिक बसत असतो. यासाठी प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. पोलिसांकडूनही नागरिकांना आवाहन केले जात आहे.

पोलीस यंत्रणा सज्जअलिबाग तालुक्यातील अलिबाग, वरसोली, थळ, आक्षी, नागाव, रेवदंडा, किहीम, मांडवा याठिकाणी समुद्रकिनारे आहेत. याठिकाणी पोलीस स्वत: जाऊन मच्छीमार बांधवांना वादळ काळात बोटी घेऊन जाऊ नये, याबाबत सूचना देत आहेत. तसेच नागरिकांनी वादळात बाहेर पडू नये, घरातच रहावे, अशा सूचना देखील पोलिसांकडून दिल्या जात आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाकडून वादळात झाडे पडल्यास त्वरित रस्ते मोकळे करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली असल्याची माहिती अलिबाग पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ओमप्रकाश कावळे यांनी दिली आहे.

Web Title: Raigad police ready on the backdrop of cyclone tauktae

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.