भगवंतांची प्राप्ती व्हावी, हा सदभाव सर्वांगात एकदा का सळसळू लागला की, मर्त्य विश्वातल्या कुठल्याही स्वरूपातल्या गोष्टींविषयी अथवा पदार्थांविषयी मनात आसक्तीच निर्माण होत नाही. ...
रणांगणावर दु:खाने उद्विग्न मन झालेला अर्जुन धनुष्यबाण टाकून देऊन रथाच्या मागील भागात जाऊन बसला. त्याचे मन करुणेने व्याप्त झाले होते. डोळे आसवांनी भरले होते. तो व्याकूळ दिसत होता. ...