प्राणशक्तीतून आरोग्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 05:48 AM2020-01-01T05:48:13+5:302020-01-01T05:48:31+5:30

आज जरी अनेक जण वैद्यकीयदृष्ट्या निरोगी असले तरी ते आंतरिक स्वास्थ्य अनुभवत नाहीत.

Health from vitality | प्राणशक्तीतून आरोग्य

प्राणशक्तीतून आरोग्य

Next

- सद्गुरू जग्गी वासुदेव

आज जरी अनेक जण वैद्यकीयदृष्ट्या निरोगी असले तरी ते आंतरिक स्वास्थ्य अनुभवत नाहीत. संपूर्ण स्वास्थ्य अनुभवण्यासाठी शरीर, मन आणि जीवनऊर्जा यांच्यात एका विशिष्ट पातळीवर समन्वय व तीव्र आंतरिक सक्रियता हवी. बहुतेकांच्या बाबतीत हे घडत नाहीये कारण जीवनऊर्जा प्रणाली स्वास्थ्यावर त्यांचे नियंत्रणच नाही. योगाच्या संदर्भात आपण जेव्हा आरोग्याविषयी बोलतो तेव्हा आपण शरीर किंवा मन यांच्याकडे बघत नाही, तर जीवनऊर्जेवर लक्ष देतो. जर तुमची जीवनऊर्जा प्रणाली; म्हणजेच तुमचा प्राणमयकोष संतुलित आणि पूर्णत: सक्रिय असेल तर तुमचे शरीर आणि मन पूर्णपणे स्वस्थ राहील. म्हणून एक अशी मूलभूत योग साधना निर्माण करणे फार महत्त्वाचे आहे जेणेकरून तुमची जीवनऊर्जा सक्रिय होईल आणि मग तुमचे शरीर व मन स्वाभाविकपणे स्वस्थ आणि निरोगी असेल. संक्रमित रोग आणि जुनाट आजार यामध्ये फरक आहे. इन्फेक्शन आपण औषध घेऊन बरे करू शकतो, तर जुनाट विकारांचे मूळ हे जीवनऊर्जेत असते. जर लोक थोडीफार साधना करायला तयार असतील तर जीवनऊर्जा किंवा प्राणमयकोष संतुलित आणि सक्रिय करून जुनाट विकारांपासून नक्कीच स्वत:ची सुटका करून घेऊ शकतात. आपण कोणत्या प्रकारचे अन्न खातो, पाणी पितो, हवा आपल्या शरीरात घेतो याचा अनेक प्रकारे परिणाम होतोच. पण जीवनऊर्जेची जर योग्यरीत्या निगा राखली गेली असेल तर या गोष्टींचा फारसा प्रभाव पडत नाही. आज वैद्यकशास्त्र फक्त भौतिक शरीरापुरतंच सीमित आहे. त्यापलीकडे काही घडलं तर त्याला तुम्ही चमत्कार म्हणता. मी त्याला विज्ञानाचाच एक पैलू म्हणतो. तुमच्या जीवनऊर्जेनेच तुमचं संपूर्ण शरीर घडवलंय. तर तीच जीवनऊर्जा शरीराची दुरुस्ती करू शकत नाही काय? जर तुमची ऊर्जा पूर्ण जोमात आणि संतुलित असेल तर केवळ आरोग्यच नव्हे तर इतर खूप काही करण्याची क्षमता त्या ऊर्जेत आहे.

Web Title: Health from vitality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.