Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
नाशिक शहरातील प्रसिद्ध श्री सोमेश्वर, श्री कपालेश्वरसह सर्वच मंदिराच्या कळसाचे दर्शन घेत भाविकांनी भगवान शिवशंकरांना कोरोनामुक्तीसाठी साकडे घातले. त्याचप्रमाणे गोदाकाठावरील लहान-मोठ्या शिवालयांमध्येही सोळा सोमवारच्या व्रताच्या महिलांसह भाविकांनी शिवल ...
त्र्यंबकेश्वर : दरवर्षी जन्माष्टमी तथा गोकुळ अष्टमीनंतर सर्वत्र दहीहंडीचा कार्यक्र म साजरा केला जात असतो. तथापि या वर्षी 31आॅगस्टपर्यंत लॉकडाउन असल्याने व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने या उत्सवास शासनाची परवानगी मिळणे शक्य नसल्याने या दह ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील अनेक गावामध्ये श्रावणातील सण कोरोना मुळे नागरिकांनी घरच्या घरी करण्यास पसंती दिली असल्यामुळे श्रावणातील सणांचा उत्साहच निघुन गेला आहे. ...
कणकवली तालुक्यातील नाटळ, भिरवंडे, सांगवे गावातील मंदिरांमध्ये श्रावणी सोमवारनिमित्त होणाऱ्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांवर कोरोनामुळे मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे मंदिरात भाविकांची किरकोळ उपस्थिती दिसून आली. ...