छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. Read More
छत्रपती घराण्याच्या वतीने बुधवारी टाऊन हॉल उद्याननजीक नर्सरी बागेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक मंदिरात शाही शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाहू छत्रपती आणि यौवराज यशराज यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजन्मकाळ उत्सव साजरा करण्य ...
शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला, स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला तसेच इतर ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त शिवाजी मंडईतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पअर्पण करुन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी अभिवादन केले. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थीनी, नागरिक व विविध मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस् ...