Chhatrapati Shivaji Maharaj greets the District Collector | छत्रपती शिवाजी महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडून अभिवादन

सांगली : छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त शिवाजी मंडईतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पअर्पण करुन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी अभिवादन केले. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थीनी, नागरिक व विविध मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, तहसिलदार चव्हाण यांच्या अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 

Web Title: Chhatrapati Shivaji Maharaj greets the District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.