Mumbai girl died after fall down from Hadsar fort on Shiv Jayanti Day | शिवजयंतीदिवशी हडसर किल्ल्यावरून पडून मुंबईच्या तरुणीचा मृत्यू 

शिवजयंतीदिवशी हडसर किल्ल्यावरून पडून मुंबईच्या तरुणीचा मृत्यू 

ठळक मुद्दे २० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज सकाळी ११.३० ते १२ वाजेच्या सुमारास घडला.

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण देशभरात उत्साहात साजरी केली जात असताना जुन्नरजवळ असलेल्या हडसर किल्ल्यावरुन पडून २० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही तरुणी मुंबईची रहिवासी असून ती मित्रांसोबत शिवजयंती साजरी करण्यासाठी हडसर किल्ल्यावर केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सिद्धी कामठे (२०) असं मृत तरुणीचं नाव आहे.


मुंबईतील ग्रुप शिवजयंती साजरी करण्यासाठी जुन्नरजवळील हडसर किल्ल्यावर गेला होता. या ग्रुपमधील एका तरुणीचा किल्ल्यावरून पडून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ११.३० ते १२ वाजेच्या सुमारास घडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृत तरुणीच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे.

English summary :
On ocassion of Shiv Jayanti one group from mumbai went to Hadsar fort located at near to Junnar, accidently one girl had fallen down from fort and died.

Web Title: Mumbai girl died after fall down from Hadsar fort on Shiv Jayanti Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.