छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. Read More
विल्होळी : कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिवरत्न मित्र मंडळ व ग्रामस्थ यांनी सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करत नियमांचे काटेकोर पालन करत शिवजयंती उत्सव साजरा केला. गुरुवारी (दि.१८) मध्यरात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिम ...