Shiv Jayanti celebration in Vilholi | विल्होळीत शिवजयंती उत्सव साजरा

विल्होळीत शिवजयंती उत्सव साजरा

ठळक मुद्देमहाराजांच्या प्रतिमेस पुष्प्पहार अर्पण करण्यात आले.

विल्होळी : कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिवरत्न मित्र मंडळ व ग्रामस्थ यांनी सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करत नियमांचे काटेकोर पालन करत शिवजयंती उत्सव साजरा केला. गुरुवारी (दि.१८) मध्यरात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचीआरती करण्यात आली व प्रसाद वाटप करत अतिषबाजी करण्यात आली.

नवनिर्वाचित सरपंच जानका चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सुरेखा थोरात, चंद्रभागा कदम, सुजाता रूपवते यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प्पहार अर्पण करण्यात आले.
सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवप्रेमी भाविकांनी आरती करून महाप्रसाद वाटप केला. यावेळी मुरलीधर पाटील, शिवाजी चुंभळे, निलेश तिदमे, स्वप्नील पांगरे, वाळू नवले, मनोहर भावनाथ, विष्णू घेळ, बाबुराव रूपवते, शिवाजी चव्हाण, बबन गायकवाड, रंजन कदम, खंडू थोरात, खंडू चव्हाण, पंढरीनाथ चव्हाण, नामदेव भावनाथ, जयराम थोरात, सुनील पोरजे, मोहन भावनाथ, संजय गायकवाड, विष्णू सहाणे, राजु थोरात, शेखर शिरसाट, राजू भावनाथ, बाळासाहेब डांगे, नवनाथ थोरात, प्रथमेश देवकर, अजय सहाणे, ज्ञानेश्वर सहाणे, अनिल थापेकर, लहू सहाणे, काशिनाथ डांगे, रामा डांगे, सुभाष चव्हाण, विजय गायकवाड, मोहन भावनाथ, गणेश थोरात आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Web Title: Shiv Jayanti celebration in Vilholi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.