छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. Read More
दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मुंबईतून अनेक महाराष्ट्र सैनिक जमले होते. त्यासाठी शहरातून बाईक रॅली काढून मनसे कार्यकर्ते पार्कात पोहचले. ...
सर्व महापुरुषांची जयंती तारखेनुसार साजरी होते. मग फक्त शिवाजी महाराजांच्या जयंतीवरून वाद का? असा सवाल राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरींनी मनसेला विचारला आहे. ...
ऐतिहासिक प्रतापगडावर आज प्रत्यक्षात अनुभवलेले हे ऐतिहासिक क्षण भारावून टाकणारे असल्याच्या भावना राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केल्या. शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार मनामनांत आणि घराघरांत रुजविणाऱ्या महिला धोरणाच ...
यवतमाळ येथे शिवतीर्थावर सकाळी ८ वाजतापासून शिवरायांच्या पुतळ्यापुढे अभिवादन करण्यासाठी मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकांची रीघ लागली होती. असाच उत्साह पुसदच्या शिवाजी चौकात पाहायला मिळाला. दिग्रस, पांढरकवडा, महागाव, नेर, घाटंजी, आर्णी, बाभूळगाव, वणी अ ...