जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ६५ झाली असून, ३८ जण बरे झाले आहेत. दरम्यान, सांगलीतील फौजदार गल्ली, मिरजेतील होळी कट्टा आणि गव्हाण येथील बाधितांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ...
मिरज तालुक्यातील तुंगजवळ असलेल्या विठलाईनगरमध्ये एका सातवर्षीय मुलीचा विवस्त्रअवस्थेतील मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला. बुधवारी सायंकाळपासून ती बेपत्ता होती. तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. सांगली ग्रामीण ...
जवळपास दोन महिन्यांच्या प्रदीर्घ खंडानंतर महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील सराफ व्यवसाय पूर्वपदावर येत आहे. लॉकडाऊनच्या काळात सोने खरेदीसाठी आॅनलाईनचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला असला तरी, ग्राहकांनी त्यास फारसा प्रतिसाद दिला नाही. एकल दुकान ...
जिल्ह्यात ज्वेलर्सची दुकाने दोन महिने बंद असल्याने सुमारे दीडशे कोटीची उलाढाल ठप्प झाली आहे. अक्षयतृतीया, गुढीपाडव्याचा मुहूर्त निघून गेला. अक्षय तृतीयेपासून काही मोठ्या ज्वेलर्सनी आॅनलाईन सोने व दागिन्यांच्या विक्रीची सोय केली होती. त्याला काही प्रम ...
मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी त्यास परवानगी देताना, त्यांना छापील किमतीत विक्री करण्याचे बंधन घातले आहे. त्यामुळे अशी विक्री परवडणारी नसल्याचे स्पष्ट करीत, परमीट रुम व बिअरबार चालकांनी नकार दिला आहे. ...
कृष्णा नदी उशाला असतानाही सांगली शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेदिवस गंभीर बनत चालला आहे. गावभागापाठोपाठ शहरातील शामरावनगरमधील पाच ते सहा कॉलनीत महिनाभरापासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. बुधवारी नागरिकांनी दूरध्वनीवरून पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी ...
कोरोनाला गावाबाहेरच रोखण्यात दोन महिन्यांपासून यशस्वी ठरलेल्या गावकऱ्यांना आता पुणे-मुंबईकर पाहुण्यांची धास्ती लागून राहिली आहे. शासनाने प्रवासाची परवानगी दिल्यानंतर देशभरातून लोक आपापल्या गावी येऊ लागले आहेत. ग्रामस्थांसाठी ही चिंतेची बाब ठरली असून ...
मतकुणकी (ता. तासगाव) येथे वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाले, त्यासोबत पत्र्याच्या अँगलला बांधलेला पाळणाही चिमुकल्या बाळासह उडून, चारशे फूट लांब जाऊन पडला. या दुर्घटनेत नंदिनी संजय शिरतोडे (वय ४ महिने) या बालिकेचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळ ...