सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे. Read More
महेश मांजरेकर दिग्दर्शित या सिरीजमध्ये अभय देओल व सुमीत व्यास यांच्यासह इतर प्रतिष्ठित कलाकार देखील आहेत. या कलाकारांची नावे लवकरच सांगण्यात येतील. ...