रिंकू राजगुरूच्या स्माईलनं चाहत्यांना लावलं याड, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 05:22 PM2021-05-27T17:22:28+5:302021-05-27T17:23:03+5:30

अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने नुकताच एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

Rinku Rajguru's smile captivates fans, video goes viral | रिंकू राजगुरूच्या स्माईलनं चाहत्यांना लावलं याड, व्हिडीओ होतोय व्हायरल

रिंकू राजगुरूच्या स्माईलनं चाहत्यांना लावलं याड, व्हिडीओ होतोय व्हायरल

googlenewsNext

सैराट चित्रपटातून घराघरात आर्ची आली रं म्हणत पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. ती सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओतील तिच्या स्माईलवर चाहते फिदा झाले आहेत. तिच्या या व्हिडीओला खूप पसंती मिळते आहे. 

अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती छान स्माईल देताना दिसते आहे. मस्टर्ड रंगाचा तिने टॉप घातला आहे आणि तिचे केस हवेमुळे उडताना दिसत आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत आपल्या चाहत्यांना हाय केले आहे.


रिंकू राजगुरूच्या या व्हिडीओवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. काही चाहत्यांनी फायरची इमोजी शेअर केली आहे. तर एका युजरने आर्ची तू अशी कमेंट केली आहे. 


रिंकू राजगुरू सध्या लॉकडाउनमुळे अकलूजमध्ये कुटुंबासोबत राहते आहे. रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती अनपॉज्ड या चित्रपटात पहायला मिळाली. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये ती दिसली होती.

आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचं तर ती मेकअप चित्रपटानंतर छूमंतर या मराठी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेत्री प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी आणि रिषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

याशिवाय हिंदीत ती अमिताभ बच्चन अभिनीत आणि नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड चित्रपटात झळकणार आहे. तसेच लॉकडाउनच्या आधी तिने अमोल पालेकर यांच्यासोबत एका प्रोजेक्टचे शूटिंग पूर्ण केले.

Web Title: Rinku Rajguru's smile captivates fans, video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.