सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे. Read More
Suresh Vishwakarma: सुरेश विश्वकर्मा बऱ्याचदा आपल्या पत्नीसोबतचे फोटो शेअर करतो. त्याच्या पत्नीचा सिनेइंडस्ट्रीशी काहीही संबंध नाही. मात्र तिच्या रिलला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते. ...
मराठी माणसांसाठी अभिमानाची गोष्ट. फँड्री, सैराट गाजवणाऱ्या छाया कदम जगप्रसिद्ध कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहेत (chhaya kadam, cannes film festival) ...