सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला. Read More
काँग्रेस अध्यक्षपद मिळाल्यानंतरही राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी आपणच राहू, असा हट्ट धरलेले अशोक गेहलोत यांच्यासाठी त्यांच्या आमदारांनी रविवारी जे काही केले, ते पाहून या नृत्याची आठवण यावी. ...
Rajasthan Congress Politics: काँग्रेसच्या आमदारांनी हायकमांडसमोर तीन अटी ठेवण्यात आल्या आहेत. सूत्रांनी सांगितले की, या अटींवर एकमत होत नाही तोवर कुठलाही आमदार बैठकीला हजर राहणार नाही ...