सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला. Read More
राजस्थानच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्रिपदावरुन चांगलीच चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत काँग्रसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत, त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. ...
राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. गहलोत यांच्या जागी हे पद कुणाला मिळणार हे अजुनही उघड झालेले नाही. या संदर्भात आज गहलोत यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे, या बैठकीत आज मुख्यमंत्र्याच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याच ...
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.आता अर्ज सादर करण्याची प्रक्रिया २४ ते ३० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. ...
प्रियांका गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सचिन पायलट यांनी आपल्या समर्थकांना सांगितले आहे की, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या समर्थक आमदारांच्या विधानांवर प्रतिक्रिया देऊ नका. ...
Election: काँग्रेसचे नेते आणि राजस्थानचे माजी मंत्री सचिन पायलट यांनी आजच्या ज्वलंत प्रश्नांविषयी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांच्याशी केलेली बातचीत. ...
यामुळे आता, काँग्रेस अशोक गेहलोत अथवा सचिन पायलट यांच्या नेतृत्वात निवडणूक रिंगणात उतरणार, की सामूहिक नेतृत्वाचा फॉर्म्युला वापरणार, हे लवकरच निश्चित होणार आहे. ...