रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
रणवीर सिंग बॉलिवूडमधला असा अभिनेता बनला आहे ज्याच्यासोबत काम करण्याची प्रत्येक निर्माता आणि दिग्दर्शकाची इच्छा आहे. सध्या तो रोहित शेट्टी आणि करण जोहरच्या 'सिम्बा'मध्ये बिझी आहे. ...
बॉलिवूडचा ‘बाजीराव’ रणवीर सिंग याचा पाकिस्तानी चित्रपट सध्या पाकिस्तानात धूम करतोय. होय, हे खरे आहे़ रणवीरने पहिल्यांदा एका पाकिस्तानी चित्रपटात काम केले आहे आणि या चित्रपटाचे नाव आहे, ‘तीफा इन ट्रबल’. ...
बी- टाऊनमध्ये 'धूम 4' ला घेऊन रोज नवी नवी चर्चा ऐकायला मिळते. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार 'धूम 4'मधून अभिषेक बच्चनला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ...