VIDEO: असा साजरा झाला रणवीर सिंगचा वाढदिवस! स्वत:च दिल्या स्वत:ला शुभेच्छा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 07:57 PM2018-07-06T19:57:13+5:302018-07-06T19:58:33+5:30

६ जुलै म्हणजे रणवीर सिंगचा वाढदिवस. आज रणवीर ३३ वर्षांचा झाला. आपला आजचा वाढदिवस रणवीरने ‘सिम्बा’च्या सेटवर साजरा केला.

VIDEO: Ranveer Singh's Birthday Celebration on simba set | VIDEO: असा साजरा झाला रणवीर सिंगचा वाढदिवस! स्वत:च दिल्या स्वत:ला शुभेच्छा!!

VIDEO: असा साजरा झाला रणवीर सिंगचा वाढदिवस! स्वत:च दिल्या स्वत:ला शुभेच्छा!!

googlenewsNext

६ जुलै म्हणजे रणवीर सिंगचा वाढदिवस. आज रणवीर ३३ वर्षांचा झाला. आपला आजचा वाढदिवस रणवीरने ‘सिम्बा’च्या सेटवर साजरा केला. तूर्तास रणवीर हैदराबादेतील रामोजी फिल्म सिटीत या चित्रपटाचे शूटींग करतोय. काल रात्री बाराच्या ठोक्याला या चित्रपटाच्या सेटवर रणवीरला मोठे सरप्राईज मिळाले. 

‘सिम्बा’चा दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि टीमने रणवीरचा बर्थ डे साजरा केला. या बर्थ डे सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे. यात रणवीर केक कापताना दिसतोय. त्याच्या मागे फटाक्यांची आतीषबाजी होतेय.
 वाढदिवसाच्या काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टीने रणवीरला एक महागडे मनगटी घड्याळ भेट म्हणून दिले होते. या घड्याची किंमत ८ लाख रूपये असल्याचे कळते.


‘सिम्बा’च्याच सेटवर रणवीर स्वत:च स्वत:ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाही दिसला. यात रणवीर आपल्या एका फॅनसोबत आहे. हा व्हिडिओही सध्या वाऱ्यासारखा पसरतो आहे.

‘सिम्बा’ या चित्रपटात रणवीरपहिल्यांदा पोलिस कर्मचा-याच्या भूमिकेत आहे. पण  ‘सिम्बा’मधील रणवीरच्या लूकची अनिल कपूरच्या लूकशी तुलना केली जात आहे. ‘सिम्बा’मध्ये रणवीरचा लांबलचक मिशी असलेला लूक यापूर्वीही आपण पाहिलाय. १९९४ मध्ये आलेल्या ‘मिस्टर आझाद’ या चित्रपटात अनिल कपूर अशाच लूकमध्ये दिसला होता. यात अनिलही एका पोलिस अधिका-याच्या भूमिकेत होता. ‘मिस्टर आझाद’मधील अनिल आणि ‘सिम्बा’मधील रणवीरचा लूक एकदम मिळताजुळता आहे. 
  ‘सिम्बा’ हा चित्रपट साऊथच्या ‘टेम्पर’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. ‘टेम्पर’मध्ये ज्युनिअर एनटीआर आणि अभिनेत्री काजल अग्रवाल लीड रोलमध्ये होते. ‘सिम्बा’मध्ये ज्युनिअर एनटीआरची जागा रणवीर घेणार आहे. 

 

Web Title: VIDEO: Ranveer Singh's Birthday Celebration on simba set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.