रमजान पर्व म्हणजे निर्जळी उपवासांचा अर्थात रोजांचा महिना. या महिन्यामध्ये हजरत मुहम्मद पैगंब र साहेबांच्या शिकवणीची अंमलबजावणी करत प्रौढ मुस्लीम सुर्योदयापुर्वी अल्पोहार (सहेरी) करत उपवासाला प्रारंभ करतो आणि सुर्यास्तानंतर काही मिनिटांनी उपवास सोडतो. ...