मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव विधानसभा निवडणुकीत दिसणार नाही. त्यांनी निवडणुकीतून माघारीची घेतलेली भूमिका योग्य आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...
"महायुती मजबूत आहे. आमच्या सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. लाडकी बहीण योजना अत्यंत लोकप्रीय आहे. आमचे सरकार आले, तर आता दीड हजार रुपये आहेत. त्यात वाढ कण्यात येईल आणि ही योजना अजिबात बंद होणार नाही." ...
आठवले यांनी म्हटले की मी ज्या ज्या पक्षाला समर्थन दिले तेव्हा तेव्हा त्यांची सत्ता आली आहे. अमित ठाकरेंची माहिमधून उमेदवारी लढण्याची एकमात्र योग्यता आहे ती म्हणजे ते राज ठाकरेंचे पूत्र आहेत, असे आठवले म्हणाले होते. ...
आठवले म्हणाले, "मी नुकताच देवेंद्र फडणवीस यांना भेटलो आहे. त्यांच्यासोबत चर्चा झाली आहे. एक तर रिपब्लिकन पक्ष छोटा पक्ष असला तरी, त्याचा जनाधार संपूर्ण महाराष्ट्रात आहे. तसेच, रिपब्लिकन पक्षाला 10-20 जागा द्या, अशी आमची मागणी नव्हती. चार-पाच जागा द्य ...