पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी नवीन कांदा लागवडीस धजावत नाहीत. कारण, कांदा लागणीनंतर पुढे पाणी कमी पडण्याची भीती आहे. सध्या कांदा बियाणे दोन हजार रुपये किलोने मिळत आहेत. यामध्ये मागणी नसल्याने वाढ होण्याची शक्यता कमीच आहे. ...
अनेक ठिकाणी दुष्काळाची स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे त्यावर उपाय म्हणून खास दुष्काळमुक्त 'जलआराखडा महाराष्ट्रासाठी विचारमंथन' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ...
जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून चिपळूण पशुसंवर्धन विभागासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून १०० टक्के अनुदानावर मका, शुगर ग्रेझ व चवळी बियाणे उपलब्ध झाले आहे. ...
काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. ...
सध्या बाजारात नवीन कांद्याची आवक एकदम कमी असल्याने दर वाढू लागले आहेत. किरकोळ बाजारात ८० रुपये किलोपर्यंत कांदा असून दिवाळीनंतर नवीन कांद्याची आवक सुरू झाल्यानंतर दरात हळूहळू घसरण सुरू होईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. ...