प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत. Read More
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केलेल्या भाष्यावर भाजपने दुस-या दिवशी जोरदार प्रतिहल्ला केला आहे. ...
गेल्या तीन वर्षांत देशातील पाचशे अभियांत्रिकी महाविद्यालये बंद पडली असून, यापुढे नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी राज्य सरकारांची संमती गरजेची असेल, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. ...
नवी दिल्ली : सुशिक्षित असूनही अतिरेकी बनण्यासाठी गेलेले परंतु तसे कृत्य न करता परत आलेल्या तरुणांना काश्मिरी तरुणांसाठीच्या खास शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकतो. ...
नावीन्यपूर्ण संशोधनात आपण मागे आहोत. त्यामुळे त्याला सर्व पातळ्यांवर प्रोत्साहन देण्याची गरज आहे. शोध हीच भारताची ताकद असून, नावीन्यपूर्ण संशोधनाला पूरक वातावरण तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडे ...