प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत. Read More
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात १९७५ साली लागू केलेल्या आणीबाणीची कहाणी सांगणारा धडा शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट केला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी केली. ...
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर पुणेकरांना नवीन नाहीत. मुळचे पुण्याचे असलेले जावडेकर सध्या केंद्रीय मंत्री म्हणून दिल्लीत कारभार बघत आहेत. त्यांना कायमच हसमुख आणि प्रसन्न मुद्रेतच पुणेकरांनी बघितले आहे. ...
महाविद्यालयांप्रमाणे शाळांच्या गुणवत्ता तपासण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यापुढे ज्या शाळा गुणवत्ता राखण्यात अपयशी ठरतील त्या बंद केल्या जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. ...
केंद्र सरकारकडून प्रस्तावित असलेली ‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अॅन्ड आर्किटेक्चर’ ही संस्था पुण्यातच होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांनीच काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे याबाबत आग्रह धरल ...
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा निराळा अंदाज गुरुवारी संसदेबाहेर पहायला मिळाला. प्रकाश जावडेकर यांनी एका हातात मोबाईल आणि दुस-या हातात रिसीव्हर पकडला होता. ...