ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
पुण्यातील नवी पेठेतील एका भारत पेट्राेल पंपावर उन्हाच्या कडाक्यापासून थंडावा मिळण्यासाठी पाण्याचे तुषार उडविणाऱ्या पंख्यांची व्यवस्था करण्यात अाली अाहे. ...
राज्यव्यापी पेट्रोल पंप घोटाळ्यातील आरोपींना ठाणे पोलिसांनी नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणाचा तपास रोखणाऱ्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून, या संदर्भात आरोपींना त्यांची बाजू मांडण्यास ...
पोलीस पेट्रोल पंपांना सुरक्षा प्रदान करीत नसेल पंप रात्री ८ वाजता बंद करण्याचा प्रस्ताव मंगळवारी विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनच्या बैठकीत ठेवण्यात आला. सुरक्षेसंदर्भात पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. ...
१ मे रोजी शहरातील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्याची घोषणा विदर्भ डीलर्स असोसिएशनने केली आहे. गुरुदेवनगर येथील पंचशील पेट्रोल पंपावर झालेला सशस्त्र दरोडा व चौकीदाराच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता ...
शहरातील टीबीटोली परिसरातील बिसेन पेट्रोल पंपावर लूटमार व कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींवर तातडीने कारवाई न झाल्यास शहरातील पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा इशारा गोंदिया जिल्हा पेट्रोल पंप डिलर्स असोसिएशनने निवेदनातून दिला आहे. ...
एटापल्ली पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यासोबत एका ग्राहकाचा वाद झाल्याच्या कारणावरून एटापल्ली येथील पेट्रोलपंप ६ एप्रिलपासून अचानक बंद ठेवण्यात आला आहे. या पेट्रोलपंपाव्यतीरिक्त एटापल्ली तालुक्यात दुसरा पेट्रोलपंप नसल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत. ...
सीमावर्ती भागातील देगलूर, बिलोली, धर्माबाद व किनवट या तालुक्यापासून काही अंतरावर असलेल्या तेलंगणा, आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी तफावत असल्याने वाहनधारक सीमोल्लंघन करत आहेत़ ...