शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी बंधाºयाच्या प्लेटस् गंजल्याने पाण्याचा अपव्यय होत असल्याचे वारंवार कळवूनही पूर्णा पाटबंधारे विभागातून बंधारा दुरुस्तीसाठी प्रयत्न होत नसल्याने परभणीकरांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे़ ...
पीक विमा नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रिलायन्स विमा कंपनीच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीने आज जिल्ह्यात १५ ठिकाणी रस्ता अडवून आपला रोष व्यक्त केला़ ...
दीड वर्षांपूर्वी तालुक्यातील वडी आणि झरी येथे सौरऊर्जावर आधारित दुहेरी पंप नळपाणी पुरवठा योजना जिल्हा परिषदेतर्फे कार्यान्वित करण्यात आली. मात्र, या नळ योजनेतून एकही दिवस टाकीतून नळाला पाणी आले नाही. यामुळे या दोन्ही गावच्या योजना कुचकामी ठरल्या आहेत ...
महसूलच्या पथकाने तालुक्यात केलेल्या कारवाईत दोन दिवसांमध्ये चार वाळूसाठे जप्त केले आहेत़ जप्त केलेली १६० ब्रास वाळू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जमा करण्यात आली़ ...
जिल्ह्यात तूर आणि हरभऱ्याची खरेदी शिल्लक असल्याने शासकीय हमीभाव केंद्रांना मुदतवाढ द्यावी, अशी शिफारस जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी राज्य शासनाकडे केली आहे़ ...
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचे गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांनी पाहिलेले स्वप्न भाजपाचे आ़ तान्हाजी मुटकुळे यांनी आक्षेप दाखल केल्याने भंग पावले असून, वरपूडकरांना रोखण्यासाठी बोर्डीकरांनी केलेली खेळी यशस्वी झाल्याचा प ...
दीड महिन्यापासून जिल्ह्यात ऊन तापत असून, उष्णतेची लाट आल्याने मागील चार दिवसांत चौघांचा बळी गेला आहे़ आगामी ४८ तासांत ऊन वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केल्याने नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे़ ...