अखेरीस मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेल्या फडणवीसांना राजीनामा द्यावा लागला. त्यांनी राजीनामा देताच भाजपमधील मुख्यमंत्रीपदाच्या इच्छुकांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून राज्यातील विरोधीपक्षनेतेपद कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
परळी मतदार संघातील पराभवानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर पाठविण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र महाविकास आघाडीच्या वाढलेल्या प्राबल्यामुळे पंकजा यांचा विधान परिषदेचा मार्ग खडतर होणार हेही तेवढंच खरं आहे. ...
पंकजा मुंडे कोणत्या मार्गाने विधीमंडळात जाणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. मात्र शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी असं सत्ता समिकरण जुळणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे विधान परिषदेवरच जाणार अशी दाट शक्यता आहे. ...
पंकजा मुंडे या मेटेंना विरोध करण्यात आपली उर्जा वाया घालविण्याऐवजी स्वत:च्या स्थिरतेसाठी त्याचा उपयोग करू घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेटेंना या टर्ममध्ये मंत्रीपद मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. ...