माजगाव-मळगाव नळपाणी योजनेत दीड कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. अनेक वर्षे ही नळपाणी योजना बंद आहे, असा सज्जड दम पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा अधिकाऱ्यांवरही शरसंधान केले. ...
तासगाव तालुक्यात दुष्काळाच्या समस्या दिवसेंदिवस भीषण होत आहेत. पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई याचा मोठा प्रश्न आहे. दुष्काळाची दाहकता जाणवत असताना, पंचायत समितीतील पदाधिकारी मात्र केवळ खुर्चीभोवतीच घुटमळत असल्याचे चित्र आहे. ...
सत्तेचा माज चढला की, मानवी विकृती आपोआप तयार होते. मनावर ताबा नसतो. अगदी असाच प्रकार मोहाडी पंचायत समितीमध्ये अनेकांनी अनुभवला. एका पदाधिकाऱ्याने अधिकाऱ्यांच्या दारावर लाथा मारून संताप व्यक्त केला. सगळ्या मर्यादा सोडलेल्या त्या पदाधिकाऱ्याने अधिकाऱ्य ...
आरमोरी तालुक्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. या तिनही कार्यालयातील प्रत्येकी एका अभियंत्यावर तालुक्याच्या विकासकामाच्या नियोजनाचा भार आहे. ...
पाणी टँचाई सारख्या विषयात हलगर्जिपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. त्याबाबत तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याचा ठराव मंगळवारी झालेल्या कणकवली पंचायत समितीच्या सभेत घेण्यात आला. ...