Parbhani Panchayat Samitee to be chaired by OBC | परभणीचे पंचायत समिती सभापतीपद ओबीसीसाठी
परभणीचे पंचायत समिती सभापतीपद ओबीसीसाठी

ठळक मुद्देजिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांच्या सभापतीपदाच्या आरक्षणाची सोडत

परभणीपरभणीपंचायत समितीचे सभापतीपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाले असून पूर्णा, पालम आणि मानवत येथील सभापतीपद खुल्या प्रवर्गासाठी सुटले आहे.

जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांच्या सभापतीपदाच्या आरक्षणाची सोडत १२ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन केले होते. त्यात सभापतीपदांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. जिंतूर पंचायत समितीचे सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सेलू , गंगाखेड आणि सोनपेठ येथील पं.स.चे सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. तर पाथरी येथील पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जातीखासाठी राखीव झाले आहे. तसेच पूर्णा, पालम आणि मानवत येथील सभापतीपद खुल्या प्रवर्गासाठी सुटले आहे.

Web Title: Parbhani Panchayat Samitee to be chaired by OBC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.