नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
बाजूच्या देशांतील अल्पसंख्याक हिंदूंना पायघड्या घालणारी ही सरकारे आज बाजूच्या राज्यांतील आपल्याच बांधवांना स्वीकारायला तयार नाहीत. या अमानुष अस्पृश्यतेस काय म्हणावे? असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. ...
वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी देशातील सहा विमानतळांचे खाजगीकरण करण्याची घोषणा केली. त्यातून सरकारला २३०० कोटींचा महसूल मिळेल व विमानन क्षेत्रात १३ हजार कोटींची खाजगी गुंतवणूक होईल असेही सीतारामन म्हणाल्या. ...
रविवारी ज्या सात क्षेत्रांसाठी सीतारामन यांनी सुधारणा, सवलती घोषित केल्या. त्यात मनरेगा, आरोग्य सेवा व शिक्षण, व्यापार, कंपनी कायद्याचे सुसूत्रीकरण, नादारी व दिवाळखोरी कायदा, सार्वजनिक उपक्रम व राज्य सरकारे यांचा समावेश होता. ...
सध्या राज्यांची बाजारातून कर्ज उभारण्याची कमाल मर्यादा त्यांच्या सकल राज्य उत्पन्नाच्या (स्टेट जीडीपी) तीन टक्के एवढी आहे. चालू वित्तीय वर्षापुरती ही मर्यादा वाढवून पाच टक्के करण्यात येत असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. ...
आत्मनिर्भर देशासाठीचा निर्धार सिद्धीला नेण्यासाठी भूमी, मजूर, तरलता आणि कायदा यावर आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये भर देण्यात येत आहे. हे संकट आणि आव्हान म्हणजे आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी संधी आहे. ...