राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
भाजप आमदार गोपीचंद पडळकर आरक्षणाच्या मुद्दयावरुन चांगलेच चर्चेत आहेत. आरक्षणाची मागणी करताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना आपण मानत नसल्याचे म्हटले होते. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीचा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. विधानसभा अधिवेशनात त्यांनी सातत्याने यासंदर्भात प्रश्न उपस्थित करत आंदोलनही केले. ...