राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Maharashtra CM Swearing-in Ceremony: प्रत्येक पक्षाचे किती मंत्री आणि कोणती खाती मिळणार याची चर्चा सुरू आहे. येत्या आठ दिवसांमध्ये इतर मंत्र्यांचा शपथविधी होईल, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ...
महायुतीत शपथविधीपूर्वीच शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील संघर्ष समोर आला आहे. त्यामुळेच आजच्या भव्य शपथविधीत केवळ ३ नेतेच शपथ घेणार असल्याचं सांगितले जात आहे. ...
पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांनाही शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आले होते. ...