राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी असणार अशा चर्चा सुरू आहेत. ...
महायुतीमध्ये भाजप ३४ ते ३५ जागा लढणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३ खासदार असताना त्याहीपेक्षा कमी जागा त्यांना मिळणार असल्याचे जे चित्र समोर आल्यामुळे चलबिचल ...