राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
महाड येथील चवदार तळ्याजवळ शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी मनुस्मृतीचं दहन करत सरकारविरोधात आंदोलन केले. त्यावेळी घडलेल्या एका प्रकारामुळे अजित पवार गट आक्रमक झाला आहे. ...
पुण्याच्या अपघात प्रकरणानंतर समाजसेविका अंजली दमानिया यांनी थेट अजित पवारांवर टार्गेट करत त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. त्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ...