राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
मुंबईच्या हितासाठी महाविकास आघाडीची मजबुती अत्यंत महत्त्वाची आहे. काँग्रेसच्या निर्णयाने या एकतेला धक्का बसला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष संवाद, समन्वय आणि आघाडी टिकवण्याच्या प्रयत्नात शेवटपर्यंत सक्षम आणि बांधील आहे, असंही मातेल ...
येणाऱ्या काळात मुंबईत स्वबळावर लढले पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्याशिवाय जे आमच्या समविचाराचे पक्ष असतील, त्यात आरपीय गट असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशीही आम्ही आघाडीबाबत चर्चा करू असं खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले. ...
पक्षाच्या चिन्हावर बिहार विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याच्या निर्णयापासून अजित पवारांनाच अंधारात ठेवले का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे ...
Bihar Election 2025 Result: या निवडणुकीत महाराष्ट्रातील एकही स्टार प्रचारक बिहारमध्ये नव्हता. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार स्वत:च्या बळावर लढले, असे म्हटले जात आहे. ...
राज्यात महायुतीत असले तरी स्थानिक पातळीवर एकमेकांचे स्पर्धक असलेली अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख राजकीय घराणी या निवडणुकीत एकत्र येण्यास इच्छुक नाहीत. त्यांना नगरपालिका स्वबळावर लढवून ताकद आजमावायची आहे. ...