महाराष्ट्रदिनी वीर मरण आलेल्या भंडारा जिल्ह्यातील तीन तरूणतुर्क जवानांना आज हजारो नागरिकांनी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. वीर जवान अमर रहे, भारत माता की जय या घोषणांसह नागरिकांनी आसमंत दणाणून सोडला. ...
गडचिरोली जिल्ह्यात नक्षली हल्ल्यात पाटोदा येथील पोलीस जवान शेख तौसिफ शेख आरेफ शहीद झाल्याची वार्ता समजल्यानंतर पाटोदा येथे शोककळा पसरली. शुक्रवारी शासकीय इतमामात ग्रामीण रुग्णालयासमोरील परिसरामध्ये दफनविधी होणार आहे. ...
वडिलांची छत्रछाया कधीचीच हरविलेली. आईने रोजमजुरी करून देशभक्तीचे धडे दिले. हीच कौटुंबीक पार्श्वभूमी घेऊन सळसळत्या रक्ताचा आग्रमन रहाटे पोलीस दलात भरती झाला. गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि नक्षलवादाने धगधगणाऱ्या भूमित तो कर्तव्य बजावित होता. ...
रस्त्यात स्फोट घडवून गडचिरोलीतील १५ पोलिसांसह १६ जणांचा बळी घेणाऱ्या नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्याने सर्वत्र रोष निर्माण केला आहे. या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणांनी ठिकठिकाणच्या फ्रंट ऑर्गनायझेशनवर (समर्थक) नजर रोखली आहे. त्यांच्या हालचालीचीही नोंद घ ...