नक्षल विरोधी अभियानाला मोठे यश; खतरनाक गोकुल मडावीसह ६ माओवाद्यांचे आत्मसमर्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 08:55 PM2019-07-28T20:55:58+5:302019-07-28T21:00:30+5:30

चार तरुणींसह सर्वांवर होती ३२ लाखाचे इनाम

Big success for anti-Naxal mission; 6 maoist with dangerous gokul madavi surrenderred | नक्षल विरोधी अभियानाला मोठे यश; खतरनाक गोकुल मडावीसह ६ माओवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षल विरोधी अभियानाला मोठे यश; खतरनाक गोकुल मडावीसह ६ माओवाद्यांचे आत्मसमर्पण

Next
ठळक मुद्देआत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये चार तरुणीही असून या सर्वांवर सरकारने एकुण ३२ लाख ५० हजाराचे बक्षीस जाहीर केले होते.सरिता उर्फ मुक्ती ही ६ वर्षापासून भामरागड दलममध्ये कार्यरत होती. दोघींवर प्रत्येकी साडे चार लाखाचे बक्षीस लावण्यात आले होते.

मुंबई - राज्यातील नक्षलग्रस्त भागातील कुख्यात समजल्या जाणाऱ्या उपदलम प्रमुख गोकुल मडावीसह सहा माओवाद्यांनी आत्मसपर्मण करुन समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. नर्मदा या वरिष्ठ माओवाद्याच्या अटकेनंतर संघटनेतील वाढते मतभेद आणि नक्षलविरोधी अभियानाच्या मुख्य हेतूचा विचार करुन हा निर्णय घेतल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये चार तरुणीही असून या सर्वांवर सरकारने एकुण ३२ लाख ५० हजाराचे बक्षीस जाहीर केले होते. गोकुल उर्फ संजू सन्नू मडावी (वय ३०),रतन उर्फ मुन्ना भिगारी कुंजामी (२२), सरिसा उर्फ मुक्ती मासा कल्लो (२०), शैला उर्फ राजे मंगळू हेडो(२०),जरिना उर्फ शांती दानू होयामी ((२९) व मिना धुर्वा (२२) अशी त्यांची नावे असून त्यांच्या शरणागतीमुळे नक्षलविरोधी अभियानाला मोठे यश मिळाल्याचे समजले जाते.
मडावी हा १२ वर्षापूर्वी पेरमिली दलममध्ये भरती झाला होता. सहा वर्षापूर्वी तो कंपनी क्रमांक -४मध्ये पी.पी.सी.एम. व २०१७मध्ये डीव्हीसी (उपदलम प्रमुख) म्हणून काम पहात होता. त्याच्यावर १५ चकमकीचे तर ३ खूनाचे गुन्हे दाखल आहेत.त्याला पकडण्यासाठी सरकारने ८ लाख ५० हजाराचे बक्षीस जाहीर केले होते. त्याच्यासह मुन्ना भिकारी हा सप्टेंबर २०१४ मध्ये सांड्रा दलमध्ये भरती होवून २०१९ पर्यत प्लाटुन क्रं.११ मध्ये सदस्य म्हणून कार्यरत होता. मौजा विजापूर घाट व आयपेंटा चकमकीत तो सहभागी होता. त्याला पकडण्यासाठी ५ लाखाचे बक्षीस होते.
सरिता उर्फ मुक्ती ही ६ वर्षापासून भामरागड दलममध्ये कार्यरत होती. तिच्यावरही ५ लाकाचे बक्षीस जाहीर होते. जरीना उर्फ शांती ही गेल्या १२ वर्षापासून माओवादी चळवळीत सक्रीय होती. तिच्यावर ८ चकमकीच्या गुन्ह्यासह एकुण १९ गुन्हे दाखल होते. तिच्यावर सरकारने ५ लाखाचे बक्षीस लावले होते. शैला व मीना धुर्वा या गेल्या वर्षभरापासून माओवादी संघटनेत सक्रीय होत्या. त्यांच्यावर जाळपोळीसह चकमकीचे गुन्हे दाखल होते. दोघींवर प्रत्येकी साडे चार लाखाचे बक्षीस लावण्यात आले होते. सहा माओवाद्यांनी शासनाकडून राबविल्या जात असलेल्या आत्मसमर्पण योजनेचे महत्व पटल्याने त्यांनी गडचिरोली येथील अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्वाखालील योजनेत शरणागती पत्करली.

आत्मसमर्पणामुळे मुख्य प्रवाहात येण्याची संधी
माडवी व त्याच्या सहकाऱ्यांनी शरणागती पत्करल्याने त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी आत्मसर्मपण योजना महत्वाची आहे. नक्षलवादी कृत्यामुळे दुर्गम व अति दुर्गम भागातील विकास वंचित राहिला आहे. त्यामुळे समाजाच्या विकासासाठी युवकांनी शासनाच्या योजनामध्ये सहभागी होण्याची गरज आहे. अन्यथा त्यांचा हकनाक बळी जाणार आहे. - राजेंद्र सिंह ( अप्पर महासंचालक, नक्षलविरोधी विशेष अभियान)

 

Web Title: Big success for anti-Naxal mission; 6 maoist with dangerous gokul madavi surrenderred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.