जिल्ह्यात बुधवारी (दि. २२) एकूण ७८ नागरिक कोरोनामुक्त झाले असून १०७ रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले आहेत. दरम्यान, नाशिक शहर आणि ग्रामीणला प्रत्येकी एक असा दोन जणांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ८६१७ वर पोहोचली आहे. ...
मिशन महापालिकेसाठी दाखल झालेल्या राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावलेले फलक महापालिका आणि पेालीस यंत्रणेने हटवून अनोखे स्वागत केले. कार्यकर्त्यांनी त्यास विरोध करून रास्ता राेको सुरू केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र, त्यानंतरही फलक हटविण्यात ...
सिन्नरजवळ अज्ञात वाहनाने पल्सर दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. सिन्नर-शिर्डी रस्त्यावर जुन्या केला कंपनीजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक फरार झाला आहे. ...
गारेगाव येथे नात्याने वडील असलेल्या रामदास गुलाब जाधव याने त्याच्या बारावर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याचा दम दिल्याची फिर्याद पीडित मुलीच्या आईने वडनेर खाकुर्डी पोलिसांत दिली आहे. ...
चांदवड येथील आहेर वस्ती व काळखोडे येथून अविनाश राजेंद्र आहेर व त्यांच्या मित्राची दुचाकी तसेच हिरो कंपनीची दुचाकी या दोन्ही दुचाकी अज्ञाताने चोरुन नेली ...
त्र्यंबकेश्वर-नाशिक रस्त्याला जोडणारा तळेगाव (अंजनेरी) ते जातेगाव रस्ता अतिवृष्टीमुळे जांभूळ जीरा तलावाजवळ खचला असून अर्ध्याच्या वर रस्ता तुटून पाण्यात गेला आहे. ...
नाशिक जिल्ह्यात देान दिवसांपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे गंगापूरसह अन्य धरणांमधून विसर्ग सुरू झाला आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण ९९. ४१ टक्के भरले आहे. ...