नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शहराला एक नव्हे तर तब्बल तीन धरणांतून पाणीपुरवठा होत असतानाही केवळ महापालिकेचे चुकीचे नियोजन आणि जलसंपदा विभागाची अतिदक्षता यामुळे नाशिककरांवर जलसंकट घोंघावू लागले आहे. दारणा नदीतील पाणी दूषित असल्याने ते घेता येत नाही तर गौतमी गोदावरी तसेच कश्यपीतील ...
मराठी भाषेच्या अस्मितेचा प्रश्न करीत इंग्रजीसह अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याची मागणी होत असून, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला होकार भरला आहे. परंतु इंग्रजी शाळांमध्ये मराठीची सक्ती करताना प्रत्यक्षात शासनाचे ध ...
महाराष्टÑातील शेतकऱ्यांच्या समस्या सर्वश्रुत आहेत. तथापि, त्यासाठी त्यांना व्यावसायिक आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण देण्याची गरज लक्षात घेऊन महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सने आता शेतकऱ्यांतून उद्योजक घडविण्याची तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत राज्यातील १११ ...
क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीची निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अॅड. गजेंद्र सानप यांनी मंगळवारी (दि.१८) घोषणा केली. संस्थेच्या अध्यक्षपदासह ४ पदाधिकारी, ६ विश्वस्त व १९ तालुका संचालक अशा एकूण २९ जागांसाठी येत्या २० जुलै रोजी ...
आदिवासी भागातील विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी व कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आलेल्या आदिवासी क्षेत्रविकास आढावा समितीने मंगळवारी पेठ तालुक्याचा दौरा करून विविध शासकीय विभागांना भेटी देऊन माहिती जाणून घेतली. ...
शालेय विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास शासनाच्या शिक्षण व क्रीडा विभागाकडून देण्यात येणाऱ्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदानाच्या धनादेशाचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे व बांधकाम सभापती मनीषा पवार यांच्या हस्ते वारसांना वाटप करण्य ...