गुरु पौर्णिमेनिमित्त गोदा काठावरील श्री एकमुखी दत्तमंदिरात रविवारी (दि.५) सकाळी पादुकापूजन, अभिषेक श्री दत्तगुरुंची आरती, पूजापाठ आदींसह विविध धार्मिक विधी संपन्न झाले. ...
शेतकऱ्यांना आपला माल कुठेही विकण्याची मुभा मिळाल्याने अनेक शेतकरी सध्या बाजार समितीच्या बाहेरच गाड्या लावून भाजीपाला विक्री करू लागले आहेत. अनेक किरकोळ व्यापारी या ठिकाणाहून भाजीपाला खरेदी करत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. ...
पंचवटी परिसरातील विविध ठिकाणी असलेल्या देवदेवतांच्या मंदिरात कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत फिजिकल डिस्टन्सिंग पाळत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. ...
जाखोरी गावात जेरबंद झालेली मादी ही किमान चार ते पाच वर्षे वयाची आहे. या मादीचे बछडेदेखील या भागात असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती वनविभागाच्या सुत्रांनी दिली आहे. ...
कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सामान्यांची धडपड सुरू असताना राजकारण्यांची आंदोलनबाजी सुरू झाली आहे. वीजबिलांची वाढ बोचणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांना इंधनाची दरवाढ जाणवत नाही, तर इंधनावर आंदोलन करणाºया कॉँग्रेसला अवास्तव वीजबिलां-बद्दल सोयरसुतक नाही ...
जखमी आयुषच्या मानेला व डोक्याला बिबट्याच्या हल्ल्यात दुखापत झाली असून त्याच्यावर बिटको रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलाची प्रकृती स्थितर असून तत्काळ सातपुते मळ्याच्या भागात पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी सांगितले. ...