शहर व परिसरात गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने सातत्याने नायलॉन मांजाची चोरीछुपी विक्री रोखण्यासाठी छापेमारीचा धडाका सुरू केला आहे. दिंडोरी रोडवरील कलानगरमधून सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे ५७ गट्टू पोलिसांच्या पथकाने छापा मारून जप्त केले आहेत. ...
तातडीने संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करुन पथकाला त्यांच्या शोधात रवाना केले. मध्यरात्री उशिरापर्यंत पोलिसांनी एका अल्पवयीन संशयित मुलासह महिला व अन्य पाच युवकांना ताब्यात घेतले आहे. ...
पोलीस सप्ताहानिमित्त नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांमध्ये रंगलेल्या क्रिकेट सामन्यात ग्रामीण पोलिसांनी वरचष्मा गाजवत शहर आयुक्तालयाविरुद्ध ६९ धावांनी दणदणीत विजय संपादन केला. पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनीही या प्रेक्षणीय सामन्याचा म ...
आईला वाईट बोलल्याचा जाब विचारल्याचा राग मनात धरून एका संशयिताने मुलास बेदम मारहाण करत धारदार शस्त्राने वार केल्याची घटना भांडीबाजारात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नायलॉन मांजाचा वापर ज्याअर्थी शहरात होत आहे, त्याअर्थी शहरातील विविध भागांमध्ये अगदी सहजरित्या नायलॉन मांजा विक्री केला जात असल्याचे स्पष्ट आहे. शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत धडक कारवाईची मोहीम राबविणे गरजेचे आहे. ...
अवैध धंदे रोखणे ही पोलिसांची जबाबदारी नव्हे तर महसूल विभागाने कारवाई करावी, अशी भूमिका पोलीस आयुक्तांनी घेतल्याने दोन खात्यांमधील अधिकार आणि कारवाईचा प्रश्न थेट उपमुख्यमंत्री तसेच सचिवांपर्यंत पोहोचला. नाशिक दौऱ्यात उपमुख्यमंत्र्यांनी यंत्रणेमधील ...