भांडीबाजारात एकावर शस्त्राने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 01:38 AM2021-01-08T01:38:52+5:302021-01-08T01:39:43+5:30

आईला वाईट बोलल्याचा जाब विचारल्याचा राग मनात धरून एका संशयिताने मुलास बेदम मारहाण करत  धारदार शस्त्राने वार केल्याची घटना भांडीबाजारात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

One attacked with a weapon in the pottery market | भांडीबाजारात एकावर शस्त्राने वार

भांडीबाजारात एकावर शस्त्राने वार

googlenewsNext

नाशिक : आईला वाईट बोलल्याचा जाब विचारल्याचा राग मनात धरून एका संशयिताने मुलास बेदम मारहाण करत  धारदार शस्त्राने वार केल्याची घटना भांडीबाजारात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबू (पूर्ण नाव माहीत नाही, असे संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी चेतन विकास पवार (२४ रा.देशमुखवाडा) याने तक्रार दाखल केली आहे. नळावर आलेल्या संशयीताने महिलेस वाईट बोलला. त्यामुळे चेतन त्यास जाब विचारण्यासाठी गेला असता संशयीत बाबूने मारहाण केली. यावेळी संशयीताने धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केल्याने युवक जखमी झाला. 
अंबडला एकाची आत्महत्या
नाशिक : औद्योगिक वसाहतीतील अंबड लिंक रोड भागातील रहिवाश्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अनिल तुकाराम माने (४० रा.विठ्ठल मंदिरामागे,जाधव संकुल) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. अनिल माने यांनी बुधवारी (दि.६) दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून पंख्यास साडी बांधून गळफास घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला.
सातपूरला महिलेची आत्महत्या
नाशिक : सातपूर कॉलनी भागात राहणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मीराबाई समाधान पाटील (रा.सातपूर कॉलनी,) असे मृत महिलेचे नाव आहे. मीराबाई यांनी बुधवारी (दि.६) आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून लोखंडी अडगळीला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: One attacked with a weapon in the pottery market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.